नायगाव तालुक्यातील रुई व रुई परिसरात असलेले सात पाझर तलाव पावसाळ्याचे दिवस लागून सुद्धा पाऊस पडत नसल्यामुळे हे सदरचे सात ही तळे कोरडेच पडले आहे
तालुक्यातील रुई व रुई परिसरात शेतकऱ्यानी तुरळक पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करुन महागा मोलाचे बि बियाणे खरीदी करुन पेरणी केली व बऱ्याच पैकी शेतकऱ्याच्या पिकांची उगवण झाली नसल्याचे स्पष्ट चित्र रुई व रुई परिसरात दिसून येत आहे
या भागातील शेतकरी म्हणजे रुई व रुई परिसरात मोठया प्रमाणात पेरणी केली असली तरी आकाशात काळे कोट ढग दिसत असलेल तरी पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे
सात पाझर तलाव सावरखेड एक कृष्णुर येथे दोन कुंटूरकर शुगर कारखाना एक रुई बु. एक घुंगराळा एक अन्य एक पाझर तलाव हे पाण्या विना कोरडेच असल्यामुळे या सदरच्या तलावात उन्हाळ्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे
गेल्या वर्षी पहिल्याच पावसाने रुई बु व रुई परिसरातील सात पाझर तलाव पाण्याने ओव्हर फूल झाले होते आणि शेतकऱ्यांची पीकही मोठ्या जोमाने निघाले होते गेल्या वर्षापेक्षा यंदा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी चिंता लागली आहे

0 Comments