Header Ads Widget

आईचा निघून खून करणाऱ्या आरोपी मुलास जन्मठेपेची शिक्षा माळाकोळी पोलीसाचा भक्कम तपास व प्रभावी न्यायालयीन पाठपुराव्याला यश !!

           माधव पवार 
माननीय कुलकर्णी अतिरिक्त सत्र न्यायाधीश २ कंधार यांनी आज पोलीस स्टेशन माळाकोळी गुन्हा रजिस्टर क्रमांक १६१ / २०२३  कलम ३०२ भादवी अन्ववे दाखल असलेल्या सत्र प्रकरण क्रमांक ०६/ २०२४ मध्ये महत्व पूर्ण निकाल देत आरोपीस दोषी ठरवून जन्मठेप व द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे 

दिनांक २४ / १०/ २०२३ रोजी मध्य रात्रीच्या सुमारास पोलीस स्टेशन माळाकोळी हद्दीतील बैलगाडी शिवार येथे कौटुंबिक कारणातून आरोपी नामे नरसिंह बालाजी केंद्रे यांनी आपल्या आईवर लोखंडी कतीने वार करून गंभीर जखमी केले होते 

सदरच्या जखमी महिलेस तातडीने उपचारासाठी कंधार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारात दरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या प्रकरणी फिर्यादी नामे बालाजी एकनाथ  केंद्रे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मळाकोळी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १६१ / २०२३ रोजी भादवी कलम ३०२ गुन्हा दाखल करण्यात आला होता 

तपासा दरम्यान मयत महिलांचे पती यांनी दिलेला जबाब आणि घटनास्थळ पंचनामा वैद्यकीय पुरावे शस्त्र जप्ती प्रत्यक्ष दर्शी साक्षीदारांचे जबाब तसेच इतर वैज्ञानिक व परिस्थितीतजन्य पुरावे संकलन करून आरोपी विरोध दोषारोप पत्र भक्कम सादर करण्यात आले होते 

माळाकोळी पोलीस ठाण्याचे दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी न्यायालयात विहित वेळेत दोषारोपपत्र दाखल केले होते तपासा दरम्यान संकलित करण्यात आलेले वैद्यकीय तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयीन गृहीत धरले त्यामुळे माननीय न्यायालयात नमूद आरोपीस दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे 

नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशाने माननीय न्यायालयात चालू असलेल्या खटल्या मध्ये विशेष लक्ष देण्यासाठी रॉयल मॉनिटरिंग सेलची स्थापना करण्यात आली आहे 

सदर प्रकरणात कागणे सहायक सहकारी अभियंता  यांनी साक्षीदारांची प्रभावी परीक्षण करून आरोपी विरोधचे पुरावे भक्कम पणे न्यायालया समोर मांडले यांनी


नईन खान पोलीस उपनिरीक्षक तसेच पोहे का पारडे पोलीस स्टेशन माळाकोळी मोलाचे सहकार्य केले आहे 

नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या प्रकरणात प्रभावित तपास करून दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे 
 
तसेच सरकारी पक्षाच्या सक्षम युक्तीवादामुळे गंभीर स्वरूपाच्या खुणाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा होण्यास यश मिळाले हा निकाल गंभीर गुन्हे करणाऱ्याना कायद्यांची वचक कायमची दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments