नायगाव तालुक्यातील रुई बु रुई परिसराच्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन व कापूस तुर मूग अशी पीके चांगलीच डोलू लागली आहे
तालुक्यातील रुई बु परिसरात असलेले सात ही पाझर तलाव अद्याप कोरडेच असले तरी पीक पूर्वक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्ग तात्पुरता समाधान असला तरी अनेक शेतकऱ्याच्या पिकाची प्रथम उगवन झाली नव्हती दुबार पेरणी केली असल्याने पिके जमिनीच्या वर आली आहे
ग्रामीण भागात म्हणजे रुई बु व परिसरात शेतकऱ्यानी यंदा सोयाबीन कापूस तूर मूग आदी पीके घेऊन पिकाची जोपास्ना शेतकरी करीत असून सध्याच्या परिस्थितीत पाऊस पडत असला तरी गेल्या वर्षा पेक्षा यंदा शेतकऱ्यांना उत्पन्न मात्र योग्य पद्धतीचे मिळणार नाही असी शंका शेतकऱ्यांना आहे
गेल्या वर्षा पेक्षा यंदा पाऊस कमी पडत असल्यामुळे रुई बु परिसरातील सात ही तळे कोरडेच असल्याचे दिसून येत असून अजून पाऊस पडला नाही तर शेतकऱ्याचे पिके वाळून जाऊ शकतात असे सुद्धा शेतकऱ्यांना वाटत आहे

0 Comments