महाराष्ट्र शासनाच्या दरबारी आंधळ जळतोय कुत्र पीठ खातोय अशी गत निर्माण झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येते विविध घटकातील विधवा महिलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती कडून मिळणारा लाभ व योजनेची माहिती महिला वर्गांना मिळत नसल्याने अनेक योजने पासून सदरच्या महिला वंचित असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विधवा महिलांच्या समस्या कडे जास्तीचे लक्ष देऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत दिल्या जाणाऱ्या योजनेच्या माध्यमातून विविध घटकातील विधवा महिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत करण्यासाठी व त्यांच्या लेकरांना पोसण्यासाठी त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे अशी विधवा महिलांच्या माध्यमातून मागणी होत आहे
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत मिळल्या जाणाऱ्या योजनेच्या लाभा पासून विविध समाजाच्या घटकातील विधवा महिला वंचित राहत असल्यामुळे व त्यांना त्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने विधवा महिलांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी शासना कडून मिळाल्या जाणाऱ्या योजना केवळ कागदावरच असल्याचे सदरच्या योजनेतून दिसून येत आहे
महिला व बालकल्याण समिती योजना जिल्हा परिषदेमार्फत महिलांना व मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीन पापड, लोणचे बनवणे किंवा इतर लघु उद्योगांसाठी ९०% अनुदानावर साहित्याचे वाटप किंवा थेट अर्थ सहाय्य दिले जाते परंतु या योजनेचा लाभ विधवा महिलांना मिळत नाही अथवा अधिकारी सांगत नसल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत मिळल्या जाणाऱ्या योजनेच्या लाभा पासून विविध समाजाच्या घटकातील विधवा महिला वंचित राहत असल्यामुळे त्यांना तात्काळ सदरच्या योजनेचा लाभ शासनानी दिला पाहिजे असे विविध घटकातील विधवा महिलांच्या माध्यमातून मागणी होत आहे

0 Comments