उस्माननगर पोलीस पथकाने अवैध वाळू उपसा करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई करून २, १०, ५०, ००० रुपयाचा केला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरची धडाकेबाज कारवाई कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांच्यासह पोलीस टीमने केली आहे
लोहा तालुक्यातील चिंचोली गोदावरी पात्रातुन अवैधरीत्या रेतीचा उपसा करणाऱ्या इसमाच्या विरोधात उस्माननगर पोलीस ठाण्याच्या पथकाने धडाकेबाज कारवाई ठाण्याचे सपोनि संजय डी निलपत्रेवार यांच्या पोलीस टीमने केली असल्यामुळे उस्मान नगर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध धंद्याला आळा बसण्यासाठी मोठे प्रयत्न करीत असताना सुद्धा महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनाच्या नजरा चुकवून जवळच्या गोदावरी पात्रातून अवैध रेतीचा उपसा करीत असणाऱ्या लोकांकडे करडी नजर ठेवत उस्माननगर पोलिसांच्या पोलीस पथकाने मोठी कारवाई केली आहे

0 Comments