Header Ads Widget

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर महामार्ग पोलीस विभाग देगलूर यांची कार्यप्रणाली एकदम परफेक्ट - वाहतुकीच्या नियंत्रणासह रस्ता सुरक्षिते कडे करडी नजर !!

      माधव पवार 
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर महामार्ग पोलीस विभाग देगलूर यांची कार्यप्रणाली एकदम परफेक्ट - वाहतुकीच्या नियंत्रणासह रस्ता सुरक्षिती कडे करडी नजर असल्यामुळे रस्ता अपघाता मध्ये बऱ्याच पैकी घट झाली असल्याने वाहन धारकाचे जीवन सुरक्षित झाले आहे

महामार्ग पोलीस राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर वाहतूक नियमन गुन्हेगारी रोखणेअपघातग्रस्त मदत आणि रस्ता सुरक्षितता राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात वाहनांची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करणे, वेगमर्यादा अंमलबजावणी करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत पुरवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे

नायगाव तालुक्यातील कल्याण टोलनाच्या जवळ असलेल्या महामार्ग पोलीस विभाग देगलूर अंतर्गत सदरील पोलिसांच्या माध्यमातून वेळोवेळी वाहनाची तपासणी त्याचबरोबर वाहन चालवताना तो चालक दारूच्या नशेत वाहन चालवतो का ? वहानाची कागदपत्रे बरोबर आहेत का वाहनाची स्पीड कंट्रोल मध्ये आहे का अशा अनेक बाबीवर त्यांचे काटेकोरपणे लक्ष असल्याने सदरच्या पोलिसांची  कार्यप्रणाली परफेक्ट असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

तालुक्यातील नांदेड ते हैदराबाद राज्य महामार्गावर असलेल्या सदरच्या रस्त्यावर लुटमारीचे प्रकार सुद्धा कमी झाले असून जनसामान्य माणसाला आपत्कालीन काळात सुद्धा या सदरच्या पोलिसांकडून दहा ते पंधरा मिनिटाच्या आत या विभागाचे प्रभारी अधिकारी सपोनी भिकाने,पि एस आय त्र्यंबक भोस्कर फौजदार सय्यद अनवर पोलीस अंमलदार प्रदीप पुरी, संदिप राठोड, चंद्रकांत बिरादार, सुनिल सरपे, राहुल तारू पोलीस अंमलदार सिद्धेश्वर कागणे, अंगद राऊत,  राम वडजे व ईतर अंमलदार यांच्या कडून मदत मिळत आहे


 

Post a Comment

0 Comments