हिमायतनगर तालुक्यातुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पळसपुर घाटातिल पात्रातुन विदर्भातून ट्रॅक्टर टिपर च्या साह्याने हिमायतनगर तालुक्याचे हद्दीतून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पात्रातुन अवेध वाळु वाहतुक होत असलेल्या माहितीवरून हादगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगरच्या तहसीलदार सर्वपल्ली ताई टेमकर यांच्या सूचनेवरून पथक प्रमुख बि एम चव्हाण यांनी आपल्या सहकार्यासह चार ठिकाणी पाच दिवसात तिन कार्यवाह्या हिमायतनगर महसूल पथकाने पैनगंगेमध्ये रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक करणारे वाळुसहित ट्रक्टरवर पकडून धडक कारवाई करुन वाहन हिमायतनगर तहसील कार्यालयामध्ये जप्त करण्यात आले आहे . अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू माफिया वर प्रशासनाची करडी नजर असुन दिनांक 4 आणि 5 रोजी रात्री बेरात्री हिमायतनगर तालुक्यात अवैध वाळु वाहातुक होत असल्याने हिमायतनगर तालुक्यातील अवैध वाहतूक रोखण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना मा.ऊपविभागीय अधीकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मा.तहसीलदार सौ पल्लवीताई टेमकर याच्या आदशाने गौण खनिज पथक प्रमुख यांच्या सोबत आकाश बारकुल वाहण , महसूल सेवक भिमराव जाधव, योगेश आलेवाड, यांनी मौजे पळसपुर येथे अवैध वाळु वहातुक करणारे हिमायतनगर तहसील कार्यालय यांच्यापथकाने अवैध वाळु वहातुक करणार्या वाहणावर करडी नजर ठेऊन दि.५फेब्रुवारी रोजी पळसपुर येथे वाळु वाहतुक करणार्या ट्रक्टरला पकडुन वाळुसहित वाहन पथकाने जप्त करुन तहसील कार्यालयात जमा करण्यात येऊन कारवाई करण्यात आल्याने अवैध वाळु वहातुक करणार्याचे धाबे दणाणले अवैध वाळुवहातुक करणार्यावर प्रशासनाची करडी नजर असल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची गये केली जाणार नसल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांनी सांगितले आहे

0 Comments