नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वी चालत असलेले खेड्यापाड्यातील अवैध धंदे आता जवळपास ९९ टक्के अवैध धंदे बंद करण्यात आले असून सदरची बडिया कामगिरी सपोनि विशाल पाटील भोसले यांनी केली आहे
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखांना सूचना दिल्यानुसार कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहे
नायगाव तालुक्याच्या कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गेल्या एक ते दोन वर्षाखाली या ठाण्याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले होते परंतु कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी अवैध धंदे करणाऱ्यांना थाराच दिला नसल्यामुळे सदरचे अवैध धंदे नव्याने टक्के बंद केल्याची कामगिरी केली आहे
सदरच्या कुंटूर पोलीस ठाण्याच्या दमदार साहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी संबंधित बीट जमादार व पोलीस कर्मचाऱ्यांना सदरचे अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना दिल्यामुळे बीट जमादार व अंतर्गत बीटचे कर्मचारी अधून मधून पोलिसांच्या नजरात चुकून अवैध देशी दारू विदेशी दारू विक्री करणाऱ्या कडे लक्ष ठेवून आहेत

0 Comments