नायगाव तालुक्यातील कृष्णूर युनिट अंतर्गत असलेल्या गावातील शेतकऱ्यांना किमान बारा तास थ्री फेजची लाईट शेतकऱ्याला मिळावी म्हणून रुई बु येथील तमाम शेतकरी वर्ग उद्या म्हणजे दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी विद्युत वितरण कंपनी युनिट कृष्णूरचे सहाय्यक अभियंता जाधव यांना निवेदन देण्यासाठी शेतकऱ्यांनी निश्चय केला आहे
तालुक्यातील रुई बु येथील शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थिती मध्ये केवळ आठ तास लाईट मिळत असली तरी विद्युत वितरण कंपनीच्या कामकाजामुळे अनेक वेळा दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहत आहे
सध्याच्या परिस्थितीमध्ये हिवाळी लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली असल्यामुळे या रुई भागात म्हणजेच रुई बु गावातील शेतकऱ्यांना कृष्णुर अंतर्गत मिळणारी लाईट शेतकऱ्यांना सुरळीत मिळत नसल्यामुळे संतापले आहे
शेतकऱ्या लाईट आठ तास करण्या ऐवजी व करण्या ऐवजी १२ तास लाईटची व्यवस्था करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या पिकांचे होत असलेले नुकसान टाळावे या मागणीसाठी सदरच्या शेतकऱ्याने कृष्णुर युनिटच्या सहाय्यक अभियंत्याला निवेदन देणार आहेत
रुई बु येथील शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की आजूबाजूच्या तालुक्यात सदरच्या शेतकऱ्यांना १२ तास लाईट उपलब्ध थ्री फेज असते परंतु कृष्णवर युनिट अंतर्गत असलेल्या गावातील शेतकऱ्यांना सदरची लाईट बारा तास का मिळत नाही हा महत्त्वाचा प्रश्न सदरचे शेतकरी सहाय्यक अभियंता जाधव यांना सदरची लाईट बारा तास करण्यासाठी निवेदन देऊन विनंती करणार आहेत

0 Comments