Header Ads Widget

पोटा-कामारी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणातडॉ प्रकाश वानखेडे पळसपुरकर यांच्या सौभाग्यवती निवडणूक लढविणार !!

नागोराव शिंदे पळसपुरकर

हिमायतनगर : नांदेड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला वेग आला असून आठवडाभरात आचारसंहीता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी करण्यास  सुरूवात केली केली आहे. पोटा-कामारी जिल्हा परिषदेच्या आखाड्यात दिग्गजानी कंबर कसली असून  डॉक्टर प्रकाश वानखेडे पळसुरकर यांनी रिंगणात उतरण्याचे निश्चित केल्याने  या जिल्हा परिषदे गणात वेगळाच रंग चढला असून डॉ प्रकाश वानखेडे पळसपुरकर यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मतदारसंघातील मतदार मधुन जोरदार चर्चा चालू झाली आहे. पळसपुर येथील यशस्वी सरपंच आणि चेअरमन व कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगर चे माजी सभापती म्हणून त्यांची ओळख असुन भावि जिल्हा परिषद सदस्या सौ सुशीलाताई डॉ प्रकाश वानखेडे यांचा पत्नी यांनी सुद्धा पळसपुर ग्रामपंचायत च्या माजी सरपंच यांनी सुद्धा आपल्या कारकीर्दीत मतदार बंधु आणि भगिनींना त्यांनी आपल्या कामाचि पकड दाखवुन दिले आहे,    डॉ प्रकाश वानखेडे त्यांनी सरपंच पदाच्या कारकिर्दीत पळसपुर गावचा विकास साधण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले असून तत्कालीन आमदार माधव पाटील जळगावकर यांचे ते अत्यंत विश्वासू व्यक्तिमत्व असल्याने पळसपुर गावचा विकास कसा साधला जाईल याचेज्वलंत उदाहरण म्हणजे
डॉ प्रकाश वानखेडे पळसपुरकर. सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकप्रियतेबरोबर डॉ  क्षेत्रात त्यांचे मोठे नाव असून सर्वात महत्वाची बाजु म्हणजे त्यांची नाळ प्रत्यक्ष शेतकऱ्यांसह  ग्रामस्थांशि त्यांचि नाळ जुळलेली असुन डॉ प्रकाश वानखेडे हे नेहमी दिलासा देण्याच काम करत आहेत. त्यामुळ मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात मतदार वर्ग त्यांच्या पाठीशी
मोठ्या संख्येने उभा आहे. अनेक
मोठा जनाधार आणि सामाजिक कार्यामुळे डॉ प्रकाश वानखेडे यांचा विजय निश्चित असल्याचे मतदार संघातून बोलल्या जाता आहे

Post a Comment

0 Comments