Header Ads Widget

राजकीय आखाड्यातील हे तगडे वाघ त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात कोणत्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाणून बुजून त्रास दिलाच नाही अथवा त्याच्या तक्रारी केल्या नाहीत !!

      माधव पवार 
राजकीय आखाड्यातील हे तगडे वाघ त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात कोणत्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाणून बुजून त्रास दिलाच नाही अथवा त्याच्या तक्रारी केल्या नसल्यामुळे त्याच्या कार्यकाळात अधिकारी व कर्मचारी चांगल्या प्रकारे दिवट्या करीत होते 

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी छोट्या मोठ्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी करत असल्यामुळे व कोणताच अधिकारी व कर्मचारी नायगाव तालुक्यात भविष्यात ड्युटी करण्यासाठी धजावणार  नाही अशी परिस्थिती सध्या तालुक्यात निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे 

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन दिवंगत माजी आमदार वसंतराव चव्हाण व माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी अधिकारी व कर्मचारी कुठेही चुकला असेल तर त्यांना बोलावून घेऊन त्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्याला कबूल करत होते

सध्याच्या परिस्थितीमध्ये नायगाव पंचायत समितीचे घरकुल विभाग या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यामुळे घरकुल विभाग पंचायत समिती नायगाव याला चांगलीच ताटी लागल्याचे दिसून येत आहे 

महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठवणारे माजी आमदार तथा माजी खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण व माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे राजकीय आखाड्यातील तगडे वाघ होते आणि यांच्या कार्यकाळात अधिकारी व कर्मचारी काम करण्यासाठी नायगाव तालुक्यात धजावत ही होते 


Post a Comment

0 Comments