निवडणूका कोणत्या ही असो लोकसभा असो की विधानसभा असो की नगरपालिका असो की नगरपंचायत असो सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुका असो की ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुका असो या सदरच्या निवडणुकी मध्ये निवडणुक लढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात धन दांडग्या उमेदवारासह हौसे गौसे नवसे निवडणुकीच्या रिंगणात नेहमी दिसत आहेत
निवडणूक आयोगाने गेल्या चार ते पाच वर्षा पासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या नव्हत्या परंतु आता निवडूणुक विभागाला जाग आली असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे सदरच्या गटाचे व गणाचे आरक्षण सुटल्या मुळे आता या सदरच्या निवडणुकीत धन दांड्यासह हौसे गौसे नवसे उमेदवार निवडूनुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता दाट दिसते आहे
राजकीय पुढारी निवडणुकीच्या तोंडावर अनेक सरकारी योजनेच्या व रस्त्याचे व विकासाचे उमेश दाखवून जनसामाने माणसांची दिशाभूल करीत असतात पाच वर्षांच्या काळानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागत असल्यामुळे धन दांडग्या सह हौसे गौसे नवसे यांच्यात नवचैतन्य निर्माण झाल्याचे स्पष्ट चित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येत आहे
सन २०२१ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मदती संपल्या होत्या तेव्हा पासून निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर केले नसल्यामुळे व आज पर्यंतच्या कार्यकाळात सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे कार्यालय वाऱ्यावर होती अखेर निवडणूक विभागाला जाग आली असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर केले व आरक्षण ही सुटले आहे

0 Comments