सावधान : नायगाव तालुक्यात सतत जोराचा पाऊस पडत असल्यामुळे गोदावरी काठा वरील शेतकऱ्यानी आपले जनावरे सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचे नायागांवच्या तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांचे आवाहन केले आहे
तालुक्यातील बळेगाव बंधाऱ्याच्या बँक वॉटरचे पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे नायगाव तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गोदावरी काठावरील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले जनावरे आपल्या शेतात जागलीवर बांधले असतील त्यांनी आपले जनावर गावाकडे आणून सुरक्षित ठिकाणी बांधण्यात यावे असे आवाहन नायगावच्या तहसीलदार यांनी नायगाव फास्ट न्यूज शी बोलताना सांगितल्या आहेत
नायगाव तालुक्यात सतत दोन ते दिवसा पासून सतत पाऊस पडत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यासाठी शेतकऱ्यानी स्वतःसह जनावराची काळजी घेणे अत्यंत गरज असल्यामुळे कोणत्या शेतकऱ्यानी पुराच्या पाण्यातुन कुठे ही जाण्याचा प्रयत्न करू नये असे ही नायगावच्या तहसीलदार डॉ गायकवाड यांनी सांगितले आहे

0 Comments