मुख्यमंत्री लडकी बहीण योजना जशी राज्यात प्रभावी पणे व प्रमाणिक पणे शासन राबित असले तरी याच योजने प्रमाणे राज्यातील विधवा महिलेसह श्रावण बाळ योजना असो की असो की इतर योजना असो त्या योजनेचे हप्ते दर महिन्याला लाभार्थ्यांच्या बँक खाते जमा करण्यात यावी अशी मागणी होत आहे
शासनाच्या कोणत्या ही असो या योजनेचे हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने प्रमाणे का ? जमा केले नाहीत असा प्रश्न गोरगरीब लाभार्थ्यांना पडला आहे
राजाचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लोकसभा व विधानसभा निवडणुच्या तोंडावर काढण्यात आली होती या धर्तीवर महिलांचा मतदान रुपी आशीर्वाद ही लाडक्या बहिणीचा सरकारला लागला आहे
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याचे सरकार चालवीत असल्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जशी प्रभावी पणे म्हणजे प्रत्येक महिन्याला मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा होत तशाच पद्धतीचे हप्ते इतरही योजनेचे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे
राज्यात तशाच पद्धतीने विधवा महिला असो की श्रावण बाळ योजने असो अपंगाचे पैसे असो हे त्यांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला जमा करण्यासाठी शासन प्रयत्न करीन काय असा सवालही जनसामान्य गोरगरीब लाभार्थ्यातून केला जात आहे
श्रावण बाळ योजने सह वयोवृद्ध महिला असो अपंग योजनेचे पैसे असो त्यांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला जमा करणे गरजेचे आहे
परंतु सरकार तसे करत नाही कधी चार महिन्याला हप्ते जमा करतो तर कधी पाच महिन्याला करतो तर कधी सहा महिन्याला करतो असे न होऊ देता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने प्रमाणे सदरच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सदरच्या योजनेचे पैसे जमा करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे

0 Comments