Header Ads Widget

सरकारी योजनांसाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी अँग्री स्टार्क बनवणे आवश्यक सचिन जावरकर

नागोराव शिंदे पळसपुरकर 
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर 

हिमायतनगर सरकारी योजनांसाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी अँग्री स्टार्क बनवणे आवश्यक असल्याचे महसूल व कृषी विभागाने जनजागृती मोहीम राबवली असुन हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर सज्जा मधील पळसपुर डोलारी सिरपली सिल्लोडा येथील सर्व शेतकरी बाधवांनी शेतकरी फार्मर् आयडी अँग्री स्टार्क बनवुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन हिमायतनगर च्या  तहसिलदार सौ पल्लवी टेमकर आणि तालुका कृषी अधिकारी बंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर सज्जा मंडळ अधिकारी बि एम चव्हाण पळसपुर सज्जाचे तलाठी सचिन जावरकर  एस व्हि बिराडे आणि कृषी सहाय्यक ओ व्ही कोठुलवार यांनी आज पळसपुर डोलारी शिरपली शेलोडा व पारडी ज येथे दिनांक १०  मार्च रोजी पळसपुर येथील शेतकऱ्यांना फार्मर आयडी अँग्री स्टार्क संदर्भ येथील नागनाथ मंदिरामध्ये माहिती देताना जनजागृती मोहीम कार्यक्रमा दरम्यान शेतकऱ्यांना आह्वान केले आहे.
शेतकरी फार्मर्र आयडी म्हणजे शेतकऱ्यांचे ओळख पत्र जसे की एक प्रकारे आधार कार्ड आधारित ओळख पत्र आहे राज्य भुमी अभिलेख प्रणालीशी सक्रीय जोडलेली आहे म्हणजेच
शेतकऱ्यांच्या जमिनी नोंदी मध्ये बदल वैगरे झाल्यास शेतकरी ओळख पत्र आपोआप अपडेट होईल. शेतकरी फार्मर् आयडी अँग्री स्टार्क च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभघेण्यासाठी सुलभ होईल तसेच या ओळख पत्रामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल.असे कि पिक विमा ,पि एम किशान, योजना नमो शेतकरी योजना ,सरकारी अनुदान पिक कर्ज कुषी विभागातील विविध योजनांचा शेती विषयक विविध विभागातील शासकीय योजनांचा शेतकऱ्यांना लाभ घेता येईल शेतकरी फार्मर् आयडी अँग्री स्टार्क मुळे शेतकरी योजना आणि अनुदानामधे पारदर्शकता वाढेल व शेतकरयांना या ओळख पत्रामुळे फायदा होईल त्या साठी शेतकऱ्यांनी ओळख पत्र काढून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन हिमायतनगर महसूल आणि कृषी विभागाने केले आहे. या कार्यक्रमा वेळी सरपंच सौ गंगाबाई लक्ष्मण मांजरे 
पोलीस पाटील शंकर वानखेडे    कृषी मित्र कल्याण वानखेडे ग्रामपंचायत शिपाई आबाराव पवार रोजगार सेवक संजय वाडेकर शेतकरी विनायक बोंबीलवार आनंदराव बोंबीलवार शेतकरी महिला लक्ष्मीबाई दिगंबर कोमलवार संजय कदम दिगांबर देवसरकर धीरज जाधव विठ्ठलराव वानखेडे गजानन वानखेडे सोपानराव देवसरकर बाळू देवसरकर दिगंबर वानखेडे  आधी पळसपुर सह डोलारी सिरपल्ली सिलोडा सज्जातील  शेतकऱ्यांनी वरील कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला असल्याचे कृषी सहाय्यक ओ व्ही  कोठलवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे

Post a Comment

0 Comments