नायगाव तालुक्यातील मांजरम येथे सध्याच्या तांत्रिक युगात अँड्रॉइड मोबाईल फोन वापरणे जितके सोपे आहे तितकेच अवघड सुद्धा आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील महिलांमध्ये सुद्धा मोबाईल फोन मोठ्या प्रमाणात वापरले जातात. हॅकर कडून त्यांचा मोबाईल फोन कधी हॅक केला आहे
हे त्यांना सुद्धा समजत नाही आणि त्यातूनच महिलांच्या खात्यातून पैसे काढून घेणे,अश्लील फोटो,अश्लील व्हिडिओ बनविणे,लोन घेतल्याची धमकी देणे,पोलीस सी.आय.डी,इन्कम टॅक्स,बँक अधिकारी बोलत आहे म्हणून वारंवार त्रास देणे,लॉटरी लागल्याचे आमिष,ऑनलाइन गेम वरून पैसे जिंकल्याचे आमिष,एटीएम कार्डचा नंबर मागणे, आधार अपडेट विषयी माहिती विचारणे,असे वेगवेगळे पर्याय वापरून आर्थिक फसवणूक व मानसिक त्रास दिला जातो.
यातूनही ग्रामीण भागातील महिलांनी सुरक्षित रहावे म्हणून कै.गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी सायबर सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन मांजरम येथील कांतया आप्पा मठ संस्थान सभागृहात करण्यात आले होते
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
आज मोबाईल हा जीवनातील एक आदी विभाज्य घटक बनलेला आहे.कंप्यूटर आणि प्रसार माध्यमांच्या या डिजिटल जगात सायबर क्राईम चे गुन्हे वारंवार वाढतच आहेत
ऑनलाइन पद्धतीने होणारी फसवणूक व त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक होणारे नुकसान हे कुणाला ही न परवडणारे एकदा सायबर क्राईम विळख्यात अडकलेला माणूस वारंवार अडकत जातो आहे
आणि शेवटी आत्महत्या करून आपले जीवन संपवतो.
त्यामुळे या विषयी जागरूकता निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. जयश्री गणपतराव माली पाटील यांनी व्यक्त केले.
मोबाईल वरून आर्थिक फसवणूक झाल्यामुळे कौटुंबिक वाद निर्माण होतात.मोबाईल वापरणे जरी योग्य असले तरी त्याचा उपयोग योग्य पद्धतीने केला पाहिजे.घरातील लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल देण्याचे प्रमाण महिलांमुळेच वाढत आहे
आणि ही अत्यंत चिंताजनक बाब आहे असे मत श्रीमती सीमाताई बेंद्रीकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सायबर सेल सुरुवात केले असून आपली जर ऑनलाइन फसवणूक झाली तर आपण रीतसर आपली तक्रार या सायबर सेलमध्ये दाखल करू शकतो
महिलांनी सायबर विषयी जागरूक राहून एक सतर्क नागरिक असल्याचे कर्तव्य पारपाने ही सुद्धा आपली जिम्मेदारी आहे असे मत संस्थेचे अध्यक्ष श्रीपत पाटील शिंदे यांनी व्यक्त केले.ज्योतीताई कदम,सुप्रिया भिमराव नव्हारे,महाराणी मांजरमकर,सुमेधा मांजरमकर, रेखाताई शिंदे,सारिका मंगनाळे या सर्वांनीआपले मनोगत व्यक्त केले
सदरील कार्यक्रमासाठी गोदावरी,जांभळे कल्पनाताई जांभळे,मंजुषा शिंदे,अंजली शिंदे,सारिका पांचाळ या सर्वांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया नव्हारे यांनी केले तर आभार मनीषा शिवराज शिंदे यांनी मानले.

0 Comments