Header Ads Widget

शिधापत्रिका धारकांनी ई -केवायसी पूर्ण करून घ्यावी सौ पल्लवी टेमकर यांचे आवाहन !!

नागोराव शिदे पळसपुरकर 
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर 

हिमायतनगर    :    हिमायतनगर तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारकांची ई-केवायसी करून अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी अन्यथा मोफत धान्य योजनेसह सर्व सुविधा बंद करण्यात येणार असल्याचे हिमायतनगर तहसीलदार सौ पल्लवीताई टेमकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले कि ई-केवायसी करण्यासाठी स्वस्त धान्य दूकानदार यांच्याकडे संपर्क साधावा किंवा मेरा ई-केवायसी अॅपच्या माध्यमातूनही घरबसल्या मोबाईलद्वारे केवायसी करावी, असे आवाहन तहसीलदार टेमकर यांनी केले आहे. या वेळी प्रियंका धोटे पुरवठा निरीक्षक अधिकारी पुरवठा निरीक्षक छाया नागर्थवार पुरवठा लिपिक आर यु पवार  मारोती गाडेकर, विकास गोरे, उपस्थित होते

Post a Comment

0 Comments