Header Ads Widget

शासकीय सेवेतील उत्कृष्ट चेहरा बालाजी चंचलवाड हे ३६ वर्ष सेवा करून शासकीय सेवेतून सेवा निवृत्त !!

          माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील रुई बु येथील भूमिपुत्र बालाजी नामदेव चंचलवाड हे रुई नगरी तुन प्रथम शासकीय सेवेत म्हणजे शिक्षक पदावर गेले आणि शासकीय सेवा अतिशय सहज पणे ३६ वर्ष सेवा पूर्ण करून सेवा निवृत्त झाले आहे 

नायगाव तालुक्यातील रुई बु नगरीचे भूमिपुत्र बालाजी नामदेव चंचलवाड हे प्रथम शिक्षक म्हणून इज्जतगाव तालुका नायगाव येथे आपला कार्यकाळ पूर्ण करून प्राथमिक पदवीधर शिक्षक झाले आहे 

असून या ठिकाणी सुद्धा अतिशय उत्कृष्ट पणे आपला कार्यकाळ सांभाळला असल्याची माहिती रुई नगरीचे दुसरे भूमीपुत्र तथा इज्जतगाव प्राथमिक शाळेचे उत्कृष्ट शिक्षक तथा तीन नंबरला रुई बु नागरितून शिक्षक झालेले एम डी शिंदे यांनी दिली आहे 

तालुक्यातील रुई बु येथील भूमी पुत्र बालाजी चंचलवाड हे या नगरीतुन प्रथम शिक्षक झाले तसेच सावरखेड येथील मुख्याध्यापक भाऊराव पुंडलिकराव कानोले हे सुद्धा रुई बु येथील द्वितीय  शिक्षक झाले आहेत 

रुई बु नगरीचे उत्कृष्ट शिक्षक इज्जतगाव तालुका नायागांव कांबळज फळी, रुई बु, किनवट तालुक्यातील परोडा तांडा, लोहा तालुक्यातील धनंज बु टाकळगाव तसेच बिलोली तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा तळणी येथे केंद्र प्रमुख म्हणून उत्कृष्ट पदभार सांभाळला आहे 


Post a Comment

0 Comments