Header Ads Widget

घुंगराळ्याच्या सामाजिक कार्यकर्त्यांची बडिया कामगिरी राज्य परिवहन मंडळला धारेवर धरून अखेर घुंगराळा येथे बस थांबण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी - नेता असो की कार्यकर्ता जन सामान्यासाठी झटणारा असावा - जनतेचा सवाल !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले तथा गेल्या अनेक वर्षा पासून सामाजिक क्षेत्रात काम करणारे व राज्य परीव्हन मंडळात गेल्या अनेक वर्षा पासून उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी बजावणारे घुंगराळा नगरीचे भूमिपुत्र व्यंकटराव पाटील सुगावे यांनी सदरच्या बस स्टॅन्ड वर होत असलेली प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मोठे यश प्राप्त केले आहे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर प्रत्येक राज्य परिव्हन मंडळाची बस घुंगराळा येथे थांबलीच पाहिजे असा पवित्रा घेऊन राज्य परिवहन मंडळाला धारेवर धरून सदरची बस घुंगराळा येथे थांबलीच पाहिजे या मूळ हेतूने प्रयत्न केला आहे 

घुंगराळ्याच्या सामाजिक कार्यकर्त्यांची बडिया कामगिरी राज्य परिवहन मंडळला धारेवर धरून अखेर घुंगराळा येथे बस थांबण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी - नेता असो की कार्यकर्ता जन सामान्यासाठी झटणारा असावा - जनतेनी असा रोखठोक सवाल केला आहे 

सदरच्या घुंगराळ्याच्या बस स्टैंडवर बसेस थांबू लागल्या असून यांच्या कौतुकास्पद कार्याला जनतेसह प्रवाशा कडून शतशः सलाम  केला जात असल्याचे सदरच्या जनतेतून व प्रवाशातून बोलल्या जात आहे 

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेले हे घुंगराळा गाव तीन राज्याला जोडल्या गेले असून यातील राज्य आंध्रप्रदेश कर्नाटक तामिळनाडू या राज्याला जाण्यासाठी प्रवासाना जवळ आणि सोपा मार्ग असल्यामुळे घुंगराळा येथे ह्या तिन्ही राज्यात जाण्यासाठी प्रवाश्याची मोठी वर्दळ आहे 

राज्य परिवहन मंडळाची बस घुंगराळ्यावर अधिकाऱ्याच्या व बस चालक आणि वाहन चालक यांच्या मनमानी कारभारामुळे सदरच्या राज्य परिवहन मंडळाच्या बसेस थांबत नव्हत्या व सकाळी सकाळी शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा यांचा मोठा फटका बसत होता अनेक महिन्या पासून खेळखंडोबा चालला आहे 

या सर्व बाबी लक्षात घेऊन घुंगराळा नगरीचे भूमिपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ता व्यंकटराव पाटील सुगावे यांनी सर्वच म्हणजे लोकल बसा जेवढ्या असतील तेवढ्या ह्या बस स्टैंड वर थांबल्यास पाहिजे असा हट्ट धरून सदरचे यश प्राप्त केले आहे 

या घुंगराळा येथे अनेक बसेस थांबू लागल्या असल्यामुळे एक ही प्रवासी ताटकळत असल्याचे आता दिसून येत नाही व्यंकटराव पाटील सुगावे यांच्या कोतुकास्पद कार्याला जनते कडून शतशः सलाम केला जात आहे 

Post a Comment

0 Comments