Header Ads Widget

आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट हे ओझे नाही प्राणाचे सुरक्षा कवच - पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांचे मत !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या वाढदिवसा निमित्त कै.गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड संयुक्त विद्यमाने सर्व वाहन चालकांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आहे 
दुचाकी वाहनाच्या सरावासाठी बनविलेल्या आठ या ट्रॅक वरती नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मरकड यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उदघाटन करण्यात आले आहे 

वाहन चालकांनी गाडी चालवताना आपण हेल्मेट डोक्यावरती जड वाटते आणि आपली हेअर स्टाईल खराब होते म्हणून त्याला ओझे समजून गाडीच्या हँगरला अडकवून ठेवले जाते किंवा आपण त्याचा आपल्या सुरक्षेसाठी वापर न करता घरा मध्येच कुठे तरी काना कोपऱ्या मध्ये फेकून देतो हे अत्यंत चुकीचे असल्याचे मत पोलीस निरीक्षक मरकड यांनी व्यक्त केले आहे अपघात हा कोणाला ही सांगून होत नाही तो कोणत्या क्षणी होऊ शकतो अपघाता मुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन वाहन चालकास आपले प्राण गमवावे लागतात त्यामुळे हेल्मेटला वजन समजता हेल्मेट हे माणसाच्या प्राण्याचे सुरक्षा कवच असल्याचे त्यांनी पोलीस निरीक्षक मरकड यांनी सांगितले आहे 

सदरील कार्यक्रमाला आशिष जाधव आर टी ओ नांदेड माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर मा.दिलीपराव पांढरे,मा. बालाजीराव पाटील सुगावकर,मा.शिवाजीराव पन्नासे शिवसेना विधानसभा प्रमुख नायगाव,उमाकांतराव पा.शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष मांजरम,संभाजी पाटील शिंदे मा.चेअरमन,मा.व्यंकटराव 

दत्तात्रय पाटील शिंदे,मा.दिगंबर निवृत्ती पाटील शिंदे,व्यंकटराव केते मा.उपसरपंच,विशाल पाटील शिंदे,सचिन पाटील बेंद्रीकर, राजेश वाकरडे, धम्मानंद जोंधळे विलास माली पाटील,नारायण शिंदे,तसेच प्रशिक्षणासाठी  मांजरम गावातील व सर्कलमधील अनेक तरुण उमेदवार उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments