नांदेड / प्रतिनिधी. प्रल्हाद आयनेले सर
सगर, बेलदार, गवंडी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहुन लवकरच समाजाचे आराध्य दैवत राजा भगीरथ मंदिरसह समाजभवनाच्या जागेचा प्रश्न सोडवू असे आश्वासन नांदेड उत्तर चे लोकप्रिय आ. बालाजीराव कल्याणकर यांनी दिले.भाग्यनगर येथील शास्त्री सभागृहात राजा भगीरथ जयंती महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी आ. बालाजीराव कल्याणकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष राम आचेमवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. बालाजीराव कल्याणकर, भाजपा ओबीसी चे मराठवाडा अध्यक्ष विनायकराव सगर,सौ. संध्याताई बालाजीराव कल्याणकर, शिवाजीराव एगाडे, माणिकराव सगर, आदर्श शिक्षिका, प्रमुख वक्त्या सौ.अनुपमा बन, सिद्धेश्वर महाराज आळंदीकर आदींची उपस्थिती होती.
आ. बालाजीराव कल्याणकर पुढे बोलतांना म्हणाले नांदेड महानगर पालिका असो की विधानसभा निवडणुक प्रत्येक निवडणुकीत आपला समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे आहे
तेव्हा मी आपल्या समाजाच्या अडचणी सर्वोत्परी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील असे ही ते यावेळी म्हणून आयोजित हळदी ,कुंकू व राजा भगीरथ जयंती महोत्सवाचे कौतुक केले.
समाजाचे अध्यक्ष राम आचेमवाड, विनायकराव सगर, प्रल्हाद आयनेले, यांनी समाजाच्या समस्या मांडून त्या सोडवण्याबाबत
आ. बालाजीराव कल्याणकर यांना विनंती करून भविष्यात राजा भगीरथ आर्थिक विकास महामंडळ स्थापनेबाबत शासन स्तरावर शिफारस करावी अशी विनंती केली.
कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजा भगीरथ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमास सगर, बेलदार, गवंडी समाजातील महिला -पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांनी हळदी कुंकवासह वाण वाटप करून मनोरंजनाचा कार्यक्रमाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगर बेलदार ,गवंडी समाजातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

0 Comments