नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे श्रीक्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रेच्या निमित्ताने समस्त गावकऱ्याच्या वतीने दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी जंगी कुस्त्याचा फड रंगणार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी सांगितले आहे तालुक्यातील घुंगराळा हे गाव नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असल्यामुळे कुस्त्या खेळणाऱ्या पैलवाना येण्या व जाण्यासाठी सरळ व सोपा मार्ग असल्यामुळे घुंगराळा कुस्त्या खेळण्यासाठी महिला पैलवान सुद्धा दर वर्षी असल्यामुळे गावची यात्रा प्रगती पथावर वर्षी जात असल्याची माहिती वसंत पाटील सुगावे व यात्रा कमिटीने दिली आहे
घुंगराळा येथील खंडोबा यात्रेच्या निमित्ताने पशु प्रदर्शन भव्य भरवण्यात येत असल्यामुळे सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे कुस्त्याची दंगल व घोडा प्रदर्शन हे मुख आकर्षण असणार आहेत
खंडोबा यात्रेच्या निमित्ताने खंडोबा रायाचा पालखी सोहळा आज होणार असल्यामुळे सदरच्या यात्रेला प्रारंभ होत असून उद्या घुंगराळा येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या पटमैदानात कुस्त्याचा जंगी सामना रंगणार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी दिली आहे

0 Comments