नायगाव तालुक्यातील सर्वच शाळेच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी नायगावचे कर्तव्य दक्ष गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे यांनी मोठे प्रयत्न करणार आहेत तालुक्यातील सर्वच शाळेच्या मुख्याध्यापकासह सहशिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणा बरोबर विध्यार्थाच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी व वाढवण्यासाठी प्रयत्न करतील असे गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे तालुक्यात खेड्यापाड्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अन्य शाळेवर शिक्षकाची संख्या जरी कमी असले तरी माझे सर्वच शिक्षक चांगल्या प्रकारे विध्यार्थाना शाळेत दर्जेदार शिक्षण देत असल्याचे नायगावचे कर्तव्य दक्ष गट शिक्षण अधिकारी यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
खेड्या पाड्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठया प्रमाणात शासनाच्या ध्येय धोरणा नुसार डिजिटल करण्यात आल्या असून बऱ्याच पैकी शाळेत विध्यार्थाना कॉम्प्युटरच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करण्यासाठी कॉम्प्युटरची सोय शासनाने केली आहे
शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षकानी विद्यार्थाना त्यांच्या दर्जेदार शिक्षणा बरोबर शाळेत खो खो कब्बडी भक्ती गीत तसेच भाषण मालेच्या कार्यक्रमा बरोबर संस्कृतीक कार्यक्रमा आयोजन शाळेत करून विद्यार्थाच्या बुद्धीला चालना द्यावेत असे ही गटशिक्षण अधिकारी संग्राम कांबळे यांनी सांगितले आहे

0 Comments