Header Ads Widget

नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी एका सराईत गुन्हेगारास एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी केले स्थानबद्ध !!

      माधव पवार 
नांदेड जिल्हाचे सुपर पावर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार स्थानबद्ध करण्यासाठी कामकाज करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक भोकर खंडेराय धरणे अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकाऱ्यानी सदरची कामगिरी केली आहे 

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी सदरची उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे 

नांदेड शहरा बरोबर जिल्ह्या मध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील गुन्हे अभिलेखा वरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीची यादी तयार करून आरोपी विरोध प्रतिबंधक उपाययोजना करण्यास संबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिल्या होत्या

नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधक कारवाही करून सुद्धा त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रमुखा कडून गुरेगारांना एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्या संबंधीने एम पी डी ए प्रस्तावाची कारवाई सध्या चालू आहे  

एम पी डी ए अंतर्गत चालू वर्षा मध्ये १३ आरोपींना कारागृहा मध्ये एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलेअसून तसेच शहरात तसेच जिल्ह्या मध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगाराची यादी तयार करून त्यांना स्थानबद्ध करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे 

पोलीस ठाणे ग्रामीण नांदेड यांच्या कडून सराईत गुन्हेगार नामे वैभव पिता राजू हुंडे वय वर्ष २२वर्ष व्यवसाय बेकार राहणार दत्त मंदिर जवळ हडको नांदेड तालुका जिल्हा नांदेड या आरोपी विरुद्ध खुनाच्या प्रयत्न सहीत दरोडा शासकीय कामात अडथळा करून खुनाचा प्रयत्न करणे जबरी चोरी दरोडा दंगा गंभीर दुखापत अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल आहेत 

सदरच्या आरोपीच्या विरोध एमपीडीए अधिनियमा प्रमाणे स्थानबद्ध करण्या बाबतचा प्रस्ताव नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या कडे सादर करण्यात आला होता


Post a Comment

0 Comments