नायगाव तालुक्यातील बरबडा गावात दहा ते पंधरा हजाराची वस्ती व लोकसंख्या असताना सुद्धा व सदरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत एकूण चार ते पाच आरोग्य उपकेंद्र असताना सुद्धा या प्रार्थमिक आरोग्य केंद्राला गेल्या वर्षा पासून कायम स्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्यामुळे चिंतेचा विषय बनला आहे
तालुक्यातील बरबडा हे गाव नायगाव तालुक्यात पहिल्या क्रमांकाचे गाव असताना सुद्धा या गावात कोठ्या वधी रुपये खर्च करून दवाखान्याची मोठी भव्य अशी इमारत बांधण्यात आली परंतु येथे वैद्यकीय अधिकारीच कायम स्वरूपी नसल्यामुळे कमालीची चर्चा होताना दिसून येत आहे
सदरच्या दवाखान्याला गेल्या वर्षा पासून वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने आरोग्य विभागाने तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कायम स्वरूपी नेमणूक करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे
कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्तव्य दक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी गेल्या तीन महिन्यात बरबडा आरोग्य केंद्रा मध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया केल्या असल्याने सदरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला कुंटूर व बरबडा काम पाहत असताना ताण बसत आहे
दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करावे लागत असून सदरचा ताण तणाव कमी करण्यासाठी बरबड्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला कायम स्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी जोर धरत आहे

0 Comments