नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन प्लस आउट अंतर्गत विना परवाना बेकायदेशीर रित्या पैशाची हारजीत वर जुगार खेळणारे आरोपीवर योग्य ती कारवाई करण्याचे सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश दिल्यानुसार सदरची कारवाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी केली आहे
ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यानी व सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कोरे व डी.बी टीमने गोपनीय माहितीच्या आधारावर पैशाची हार जीत बदल छापा सदरच्या खेळत असलेल्या पत्त्यावर म्हणजे तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना चार आरोपींना ताब्यात घेण्यातआल्याची माहिती मिळते आहे
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे भोकर अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा सुशील कुमार नाईक यांच्या सूचने नुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कोरे शेख सत्तार मारोती पचलिंग माधव माने यांनी सदरची कारवाही केली आहे
सदरील प्रकरणातील आरोपी शेख अमजद शेख खादर शेख अझहर शेख रैफ मोहम्मद सुबान मोहब्बत खाजा मिर्झा इनायत तुला बेग एक बाल बेग हे चार आरोपी पळून गेल्याची माहिती असली तरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका पुढील तपास करीत आहे

0 Comments