लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रा मध्ये चांगलीच करडी नजर ठेवली असल्याचे दिसून येत आहे
दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी ठाण्याचा पदभार स्वीकारला तेव्हा पासून रस्त्यावर फिरणारे दारुडे पोलीस गाडी दिसताच पसार होत असून दारूच्या नशेत रस्त्यावर हूलडबाजी करणारे टोळके दिसत नाहीत असे दिसते आहे
नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या रात्रीच्या पोलीस गस्ती बरोबर कार्यक्षेत्रात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून करडी नजर ठेवली आहे
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गावे जरी कमी असले तरी लोकसंख्येच्या बाबती मध्ये ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असून ग्रामीण पोलीस ठाण्याची पोलीस कर्मचारी सुद्धा ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपआपली जबाबदारी पार पाडत आहेत

0 Comments