बिलोलीचे दारू बंदी अधिकाऱ्याच्या आशिर्वादामुळे ग्रामीण भागात अवैध देशी दारू व विदेशी दारूची सर्रास पणे विक्री होत असताना गेल्या अनेक वर्षा पासून डोळे झाक करीत आहे
जिल्ह्याचे सिंगम आयपीएस अबिनाश कुमार यांनी स्थापन केलेले विशेष पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी देशी दारुवर धाडी मारतात तर मग बिलोलीचे दारू बंदी अधिकारी नेमके करतात तरी काय ? असा सवाल जनतेतून केला जात आहे
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची मोठी मेहरबानी झाली असल्यामुळे जिल्ह्यात अवैध धंद्यावर धाडी पे धाडी मारल्या जात असताना सुद्धा संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख असो की बिलोलीचे दारू बंदी अधिकारी असो यांना एस पी साहेबाच्या विशेष पथकानी धाडी मारल्याच्या नंतर त्यांना जाग येत आहे
बिलोलीचे दारू बंदी अधिकारी हे नावालाच असल्यामुळे जागोजागी अवैध देशी दारू विक्री होताना दिसून येत असताना दारू बंदी अधिकारी बिलोली यांनी नेमके करतात तरी असा प्रश्न जनसामान्य माणसाला पडला असून आज पर्यंत दारू बंदीचे अधिकारी अवैध देशी दारूवर धाड मारल्याचे दिसत नाही हे वास्तव चित्र आहे

0 Comments