Header Ads Widget

नांदेड व नायगाव विधानसभा मतदार संघ काबीज करण्यासाठी मांजरम नगरीत काँग्रेस पक्षाची प्रचंड जाहीर सभा !!

      माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघाचा गड जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून नायगाव तालुक्यातील मांजरम येथे काँग्रेस पक्षाची प्रचंड जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून सदरचा नायगाव विधानसभा मतदार संघाचा गड जिंकण्यासाठी महाविकास आघाडीचे पुढारी व उमेदवार मोठी कसोटी लावत असल्याचे स्पष्ट चित्र या मतदार संघात दिसून येत आहे नांदेड लोकसभा पोटनिवडणूकींचा नांदेडचा गड काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठी कसोटी करण्यात येत असून सदरचा नांदेड गड व नायगाव विधानसभेचा गड जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या गटातील सर्वात राजकीय पुढारी प्रामाणिक पणे काम करीत असून सदरचे दोन्ही गड काबीज करण्यासाठी मोठी ताकत लावताना दिसून येत आहे लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीचे मतदान काही दिवसांवर येऊन ठेपले असल्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जागोजागी जाहीर सभा घेऊन लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण व नायगाव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार डॉक्टर मीनलताई खतगावकर यांना विजय करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्राकष्ट करत आहेत

Post a Comment

0 Comments