Header Ads Widget

नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकराचा अजित पवार गटात प्रवेश भारतीय जनता पार्टीला बहुत बडिया झटका !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय वादळ उठवणारे भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या गटात प्रवेश केला असल्यामुळे जिल्हाच्या राजकारणात परत एकदा रंग चढणार आहे 

जिल्ह्याच्या राजकारणात लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या गटात प्रवेश केल्याने भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यात बहुत बडिया झटका बसला असल्याचे वास्तव चित्र स्पष्ट दिसून येत आहे 

भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार प्रताप पाटील खिखलीकर यांना गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चांगलाच झटका बसला आहे.

माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भारतीय जनता पार्टीचे चांगल्या प्रकारे पक्षाचे काम केले असले तरी आता लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मा.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार गटात प्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पार्टीला चांगलीच खिंडार पडली असल्याची चर्चा रंगत आहे 

Post a Comment

0 Comments