Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकान दाराकडे लाभार्थ्यांनी केवायसी व आधार कार्डाची पडताळणी करून घ्यावे तहसीलदार डॉ धम्मप्रिया ताई गायकवाड यांचे आवाहन !!

        माधव पवार 
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नायगाव तालुक्यातील सर्व संस्थाने दुकानदाराकडे स्वस्त धान्य मिळण्यासाठी आपल्या आधार कारलाच्या पडताणी बरोबर केवायसी करून घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदाराकडे जावे असे आवाहन नायगावच्या महिला तहसीलदार डॉ. धर्म्मप्रिया  ताई गायकवाड यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना केले आहे नायागांव तहसीलच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ८९ गावातील स्वस्त धान्य दुकानदार ईकेवायसी करत असले तरी त्यांचा अंगठा येत नाहीत यावर प्रशासन तोडगा काढणार का ? असा सवाल जनतेनी केला आहे 
तालुक्यातील सध्याच्या परिस्थितीत राशन दुकान दाराकडे पात्र लाभार्थाच्या रांगा लागल्या आहेत शासन गोरगरीब लाभार्थासाठी जाचक अटी लावून म्हणजे केवायसी करण्याची ठरावीक मुदत देऊन कोपण देण्याचे बंद करण्याच्या मार्गावर आहे 

नायगाव तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकान दाराकडे लाभार्थ्यांनी केवायसी व आधार कार्डाची पडताळणी करून घ्यावे तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांनी आवाहन केले असून स्वस्त धान्य दुकान दार जर केवायसी करत नसेल तर आमच्या कडे सूचना करावेत असे ही त्यानी संगितले आहे 

Post a Comment

0 Comments