Header Ads Widget

हरिप्रसाद पांडे मांजरमकरने युवक महोत्सव २४ मध्ये शास्त्रीय तालवाद्यात गोल्ड मेडल मिळवलेशरद चंद्र महाविद्यालय नायगावचे घवघवीत यश


     बाळासाहेब पांडे -सर - 
------------------------------------
नायगाव येथील शरदचंद्र विद्यालयाचा विद्यार्थी तथा नायगाव चा प्रसिद्ध तबला वादक  हरिप्रसाद बाळासाहेब पांडे मांजरमकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडच्या वतीने आयोजित युवक महोत्सव ज्ञांनतिर्थ २०२४ मध्ये  तबला वादन स्पर्धेत प्रथम तर शास्त्रीय तालवाद्य स्पर्धेत गोल्ड मिडल पारितोषिक मिळवून आपले व आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे.या यशा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड,सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने या युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

विविध स्पर्धा बरोबरच आठरा आक्तोंबर रोजी शास्त्रीय तालवाद्य स्पर्धा प्रभा अत्रे  स्वरमंच या मंचावर  घेण्यात आली. या मध्ये नांदेड, परभणी,हिंगोली, व लातुर या चार जिल्ह्यातील महाविद्यालयातून २७ तबला व मृंदग वादक यांनी सहभाग  नोंदवला होता.हरिप्रसाद याना मिहिर जोशी यांनी संवादींणी वरून लहराची साथ दिली.
    
हरिप्रसाद  याने या मध्ये तबला प्रकारात प्रथम तर शास्त्रीय ताल वाद्य स्पर्धेत द्वितीय पारितोषिक युवक महोत्सव २०२४-२५ मध्ये  मिळवले आहे.हरिप्रसाद हा नांदेड येथील प्रसिद्ध तबला वादक श्री. प्रशांत गाजरे तालयोगी पंडित पद्मश्री सुरेश जी तळवलकर ह्यांचे शिष्य यांचा शिष्य असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे तबला आलंकार हे शिक्षण पुर्ण झाले आहे. 
    
नायगाव चे प्रसिद्ध तबला वादक अष्टपैलू व्यक्तिमत्व बाळासाहेब पांडे मांजरमकर यांचे चिरंजीव असूनयास त्यांचे वडील व  संगीत शिक्षक नामदेव पांचाळ सर,शंकर बिरादार सर,तबला वादक संजय देशपांडे  यांचे कडून प्राथमिकतेचे धडे मिळाले आहेत .

सिने अभिनेता शकरसेन कऱ्हाडे,सराफ,नरेंद्र चव्हाण आदीच्या हस्ते हरिप्रसाद पांडे यास गोल्ड मेडल देण्यात आले.

शरदचंद्र महा विद्यालय नायगाव बा.येथे बी कॉम मध्ये शिक्षण घेत असलेल्या हरिप्रसाद याने प्राचार्य के हरीबाबु सर,सांस्कृतिक विभाग प्रमुख सांनप सर, यांच्या मार्गदर्शनाखाली युवक महोत्सवात सहभाग घेतला व घवघवीत यश मिळवलेआहे 

त्यांच्या या यशाबद्दल एज्युकेशन सोसायटी नायगावचे सचिव प्रा.रवींद्र वसंत चव्हाण,प्राचार्य डॉ .के.हरीबाबू,उपप्राचार्य श्याम पाटील,प्रा. परर्डे सर, संघ व्यवस्थापक डॉ.एन.सानप, डॉ.संजीवनी वाडेकर,प्रा.अश्विनी जकावाड,आदी ने त्यांचे कौतुक केले तर सर्व कर्मचारी यांनी  आभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments