नायागांव विधानसभा मतदार संघाच्या माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकरासह पाच ही इच्छुक उमेदवाराना मनोज जरांगे यांनी महत्वाच्या बैठकीला बोलावले उमेदवारी दाखल करण्याचे रद्द करण्यात आला आहे नायगाव विधानसभा मतदार संघातील सर्व जनतेनी व माय बाप मतदारानी नोंद घ्यावी असे आवाहन माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी केले आहे
मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार नायगाव विधानसभा मतदार संघात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह रणजित देशमुख सतीश पाटील गजानन पाटील हणमंत पाटील बालाजी पाटील यांनी जरांगे फॅक्टर मार्फत आपला उमेदवारी अपक्ष अर्ज दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ रोजी मोठे शक्ती प्रदर्शन करून भरणार होते
नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी २४ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती व उमेदवारी अर्ज भरण्यात येणार होते
याच तारखेलाच तातडीने मराठा योद्धा जरांगे पाटलांनी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटीलहोटाळकर व इतर इच्छुकाना अंतरवाली सराटीला बैठकीसाठी बोलावले आहे
सदरचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून पुढील फॉर्म भरण्याची तारीख कळविण्यात येईल ही सर्वांनी नोंद
घ्यावी असे कळविण्यात आले आहे

0 Comments