Header Ads Widget

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर व डॉ मीनलताई खतगावकर यांच्यात लढत होऊन विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार ?

       माधव पवार 
भारतीय जनता पार्टीला नुकताच रामराम करून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री तथा खा.भास्करराव पाटील खतगावकर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोड चिट्टी दिली असली तरी येत्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हा महत्वाचा प्रश्न आहे 

काँग्रेस पक्ष स्वीकारला असल्यामुळे खतगावकर यांच्या सुनबाई डॉ मीनलताई यांना नायगाव विधानसभा निवडणुकीत हुभे करण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहे 

भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सदरच्या विधानसभा मतदार संघांचे नेतृत्व करण्यासाठी गेल्या काही महिन्या पासून सदरचा मतदार संघ पिंजून काढला आणि सर्वांच्या आशिर्वादामुळे निवडणूक लढविण्याचे स्वप्न कायम ठेवले आहे

नायगाव विधानसभा मतदार संघात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना या मतदार संघातील जनता मोठा पाठींबा दर्शविला असल्यामुळे पाटील यांना मोठी ताकद मिळाली आहे 

काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री तथा खा. भास्करराव पाटील खतगावर यांच्या सुनबाई डॉ मीनलताई खतगावकर यांनी नायागांव विधानसभा मतदार संघात मतदाराच्या भेटी घाटी घेण्यासाठी सुरुवात केले असल्याचे सांगण्यात येते आहे 

डॉ मीनलताई खतगावकर यांनी लवकरच दौरे करतील असे सांगण्यात येते आहे 



Post a Comment

0 Comments