नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघातील नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी राजाचे प्रचंड नुकसान झाले आहे
नांदेड जिल्हा प्रशासनानी अतिवृष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्याच्या थेट बांधावर जाऊन पाहाणी करून शेतीचे पंचनामे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मार्फत करावे अशी मागणी शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना मागणी केली आहे
८९ मतदार संघातील शेतकऱ्यांच्या शेतातील सततच्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे अशा पद्धतीची मागणी उत्कृष्ट शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी मागणी केली आहे
या मतदार संघातील शेतकरी राजा अगोदर पासूनच आर्थिक चंणणीत असताना त्या मध्येच भर सततच्या मुसळधार पावसाने घातली असल्याने शेतकरी राजा हा दुहेरी संकटात सापडला असल्याचे वास्तव चित्र या नायगाव विधानसभा मतदार संघातील नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यात दिसून येत आहे

0 Comments