नायगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून सदरील शेतकऱ्यांच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ अनुदान जाहीर करावे असे भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
नायगाव तालुक्यातील रुई व रूई परिसरात व तालुक्यात सकाळ पासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले तर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी केली आहे
तालुक्यातील रुई व बळेगाव जाणाऱ्या मार्गावर पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सदरचा संपर्क तुटला असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळ पासूनच नायागांव तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने या भागात पुर परिस्थिती निर्माण झाली तर शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे
नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यानी तात्काळ शेतीचे पंचांनामे शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी असे मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी मागणी केली आहे
रुई बु व रुई परिसरातील सात ही पाझर तलाव भरून वाहत असल्यामुळे रुई येथील ओढ्याला मोठा पूर आला अशा मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांच्या शेता मध्ये पाणी शिरून शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

0 Comments