Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघासाठी शिरीष भाऊ गोरठेकर यांच्यासह प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांची उमेदवारी नसेल तर माझी उमेदवारी निश्चित डॉ माधवराव विभुते !!

       माधव पवार 
राज्यात विधानसभा निवडणुका जवळ जवळ येत असल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघासाठी जिल्ह्याचे खासदार दिवंगत वसंतराव पाटील चव्हाण यांचे सुपुत्र प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे चिरंजीव शिरीष भाऊ गोरठेकर यांची उमेदवारी नसेल तर माझी उमेदवारी निश्चित असल्याचे मत डॉ माधवराव विभुते यांनी व्यक्त केले आहे 

नायगाव तालुक्यातील रुई बु येथे डॉ माधवराव विभुते यांनी नायगाव विधानसभा मतदार संघात आपली उमेदवारी कायम ठेवण्यासाठी मतदारांच्या भेटी घाठी घेत आहेत
या भेटी दरम्यान गावात छोटे खानी बैठक घेण्यात आली सदरच्या बैठकी दरम्यान नांदेड जिल्ह्याचे खासदार दिवंगत वसंतराव पाटील चव्हाण त्याच बरोबर माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा मोठ्या आदराने उल्लेख करीत म्हणाले की या दोन्ही नेत्यांचे योगदान माझ्या पाठीमागे उभे होते नायगाव विधानसभा मतदार संघासाठी माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे चिरंजीव शिरीष भाऊ गोरटेकर त्याच बरोबर जिल्ह्याचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण या दोघां पैकी एकाची जरी उमेदवारी या नायगाव विधानसभा मतदार संघात असेल तर माझी उमेदवारी नसेल असे ही डॉ माधवराव विभुते म्हणाले आहे 

परंतु त्यांची जर उमेदवारी नसेल तर माझी उमेदवारी मात्र निश्चित असेल असा सवाल ही डॉ माधवराव विभुते त्यांनी यावेळी केला आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांचा उल्लेख करीत त्यांचा चांगलाच समाचार रुई बु येथे डॉ माधवराव विभुते यांनी घेतला असून यावेळी गावातील सुज्ञान नागरिक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते 

 

Post a Comment

0 Comments