प्रधानमंत्री पीक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारा पीक विमा काही शेतकऱ्यांना पडतो तर असंख्य शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या म्हणजे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झाला नसल्यामुळे शेतकरी परेशान आहे
ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झाला नाही अशा शेतकऱ्यानी पीक विमा कंपनी कडे तक्रार करण्यासाठी १४४४७ नंबर दिला परंतु दोन दोन तास फोन लावावे लागत असला तरी तक्रारीचे तात्काळ निवारण होत नसल्यामुळे शेतकरी चांगलाच वैताकला असल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे
पडत असलेला पिक विमा हा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पडत असला तरी कमी प्रमाणात पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतकरी परत एकदा चिंतातूर झाला विमा कमी आलेल्या शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी असा ही प्रश्न निर्माण शेतकऱ्यात झाला आहे
सन २०२३ सालचा प्रधानमंत्री पीक योजनेचा पीक विमा मिळत नसल्यामुळे अगोदरच शेतकरी हैराण असताना सुद्धा विमा कंपनीने शेतकऱ्याना पिक विमा टाकण्यास सुरुवात केली आहे
परंतु असंख्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झाला नाही अशा शेतकऱ्यानी विमा कंपनीला तक्रार करण्यासाठी सांगितले परंतु दोन दोन तास वेटिंगवर शेतकऱ्यांना राहावे लागत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

0 Comments