Header Ads Widget

राज्यातली असो की केंद्रातली असो सत्ता परिवर्तन झाल्या शिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही - जन सामान्याचा सवाल !!

        माधव पवार 
देशात काँग्रेस पक्षाची सत्ता असो की भारतीय जनता पार्टीची सत्ता असो दर पाच वर्षाला निवडणूका होत असतात या कार्यकाळात सत्ता परिवर्तन झाली पाहिजे तस होत नाही निवडणूक काळात मतदार केवळ मटण दारू यांच्या आहारी जाऊन मतदान करतात हे भविष्यासाठी घातक आहे 

काँग्रेस पक्षाने या देशावर स्वातंत्र्याच्या काळा पासून राज्य केले त्यांनी देशाचे वाटोळे केले म्हणून जनतेने भाजपाला सत्तेत बसविले परंतु शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाना भाव नाही सर्वात महत्वाची बाब म्हणजे महागाईने शेतकऱ्याचे डोके चांगलेच भाजून निघाले आहे 

सत्तेचे परिवर्तन होत नाही खरे तर पाच वर्षाला सत्तेचे परिवर्तन झाल्या शिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही असे जनतेचे स्पष्ट मत आहे 

राज्यातले सरकार असो की केंद्रातले सरकार असो अनेक योजना काढत असतो अमलबजावणी ही केले जाते परंतु याच सरकारने जाचक अट्टी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करतो आहे 

असंख्य शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेचा लाभ मिळत नाही मुख्यमंत्री नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत नाही अनेक शेतकरी या लाभा पासून वंचित आहेत 

गेल्या दहा वर्षा पासून मजुराच्या हाताला काम नाही सोयाबीनला भाव नाही महागाई मोठया प्रमाणात वाढली कोरोना काळात शेतकऱ्याची मोठया प्रमाणात बेहाल झाली आहे 

सध्याच्या परिस्थित पीक विमा मिळत नाहीत अनुदान मिळत नाही म्हणून राज्यातली असो की केंद्रातली सत्ता असो दर पाच वर्षाला सत्ता परिवर्तन झाली पाहिजे असे जनतेतून बोलल्या जात  आहे 



Post a Comment

0 Comments