Header Ads Widget

महिला वरील होणारे अत्याचार तात्काळ थांबवा आणि महिलांना सुरक्षा पुरवा राज्यातील महिला असुरक्षित !!

       माधव पवार 
देशात असो की राज्यात असो नित्य नेमाने महिलावर होणाऱ्या अत्याचारात मोठी वाढ होत असल्यामुळे व सदरील महिला राज्यात असो की ग्रामीण भागात असो महिला असुरक्षित असल्यामुळे महिला वर्गांच्या अत्याचारात वाढ झाली असल्यामुळे त्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असा सवाल जनतेने उपस्थित केला आहे 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात जर महिलावर कोणी अत्याचार केला तर त्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा होत होती असे सांगितले जाते सध्याच्या परिस्थिती मध्ये पाहिल तर देशात असो की राज्यात असो महिलावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत 

या देशात लोकशाही नांदते आपण सारे भाऊ आणि बहिण असताना अशा नराधमाची मजाल महिलावर अत्याचार करण्या पर्यंत पोहोचत असल्यामुळे अशा या नराधमाला राजकीय पुढारी असो की पोलीस प्रशासन असो अशा या अशा नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे तरच सदरच्या महिला वरील अत्याचार थोडक्यात थांबतील व महिला सुरक्षित राहतील असे ही जनतेतून बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments