Header Ads Widget

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह युवा नेतृत्व संदीप पाटील कवळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरखेड येथे वृक्षारोपण

         माधव पवार 
नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  सावरखेड येथे कुमार सार्थक पांडुरंग पाटील ढगे यांच्या मुलाच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह शेतकरी नेते कवळे गुरुजी यांचे पुत्र युवकाचे नेतृत्व संदीप पाटील कवळे यांच्या हस्ते  शालेय साहित्य वाटाच्या कार्यक्रमा निमित्त वृक्षारोपण करण्यात आले आहे 

सावरखेडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला विचार मंचावर भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह शेतकरी नेते कवळे गुरुजी यांचे चिरंजीव संदीप पाटील कवळे होते तर सदरील कार्यक्रमाला सदाशिव शंकवाड, मारोती पिराजी नरवाडे, गुलाप पाटील कदम सुरेश पाटील खतगावकर यावेळी उपस्थित होते 

याच कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर श्रीपती पाटील मांजरमकर आनंदराव पाटील शिंदे आंतरगाव, कैलास पाटील सुगावे बळवंत पाटील शिंदे बाबुराव पाटील ढगे, शिवराज पाटील मांजरमकर, भुजंगराव गायकवाड, हणमंतराव पाटील ढगे, शिवानंद पाटील ढगे, पो.पा.प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते

सावरखेड येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जाधव संजय ठक्करवाड, बालाजीराव किशवे, कोम्पलवार, जानकर, बा-हाळे, देवर्षे, श्रीरामने आदी शिक्षक यावेळी उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे सुरेख असे सूत्रसंचालन किशवे यांनी केले तर आभार शाळेच्या वतीने मानले आहे

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह युवा नेतृत्व संदीप पाटील कवळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरखेड येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments