Header Ads Widget

मी काय खासदारासह आमदाराचा मुलगा नाही जनसामान्य गरीब कुटुंबात जन्मास आलो शिवराज पाटील होटाळकर !!

        माधव पवार 
भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची जन आशीर्वाद यात्रा रुई बु. नगरी मध्ये चांगलीच रंगली असल्याने समस्त गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दलित वस्तीच्या समाज मंदिराच्या पटांगणात आपल्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्त बोलताना मा. शिवराज पाटील होटाळकर म्हणाले की मी काय खासदारासह आमदाराचा मुलगा नाही मी एका सामान्य माणसाच्या कुटुंबा मध्ये जन्मास आलो आहे 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील रुई बु येथे आयोजित करण्यात आलेल्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने क्रांती सुर्य गायन पार्टीच्या वतीने माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या कार्यक्रमा निमित्त शाहिरीच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे 

सदरील गीताचे कवी तथा पत्रकार तसेच पार्टीचे पार्टी प्रमुख माधव पवार यांच्या वतीने भारदस्त गीताने सदरच्या कार्यक्रमाचे सांगता करण्यात आले आहे नायगाव तालुक्यातील रुई बु येथे दलित वस्तीत क्रांती सुर्य गायन पार्टीच्या वतीने माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांचा शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला आहे 

कार्यक्रमा मध्ये बोलताना मा. शिवराज पाटील होटाळकर या सदरच्या कार्यक्रमात म्हणाले की मी काय खासदारासह आमदारांचा मुलगा नाही मी एक जन सामान्य कुटुंबात जन्मास आलो आहे 
तालुक्यातील रुई बु येथे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने जनसामान्य माणसातला जनसामान्य माणूस मा.शिवराज पाटलाला शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी दलित वस्तीतील समाज मंदिराच्या पटांगणात तुफानी गर्दी जमली होती 

यावेळी आभार प्रदर्शन करताना रावसाहेब पवार म्हणाले की या दलित वस्तीचा  विकास झालेला नाही असे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या निदर्शनास आणून दिले आहे 

रुई बु येथे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक तथा गावचे माजी पोलीस पाटील लक्ष्मणराव पाटील शिंदे माधव संभाजी पांडे त्याच बरोबर रुई बु नगरीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष शामराव पवार ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य विद्यमान डॉ. किसनराव पवार रावसाहेब गंगाराम पवार गोपाळ गणपती पवार कोंडीबा पिराजी पवार रामदास नागोराव पवार आदी यावेळी उपस्थित होते 

सदरील कार्यक्रमासाठी धोंडीबा गंगाराम पवार नारायण तुकाराम पवार नामदेव कोंडीबा पवार केशव लक्ष्मण पवार शंकर पिराजी पवार तुकाराम कोंडीबा पवार न्हणु  उर्फ सत्ताजी पवार ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य प्रतिनिधी विक्रम कांबळे शंकर पुंडलिक पवार साहेबराव दिगंबर पवार बळवंत शामराव पवार संतोष माधव पवार सोपान गोविंद वाघमारे त्याच बरोबर या ठिकाणी महिला सह पुरुष मतदाराची मोठ्या संख्येने उपस्थिती होती 

जन आशीर्वाद यात्रेच्या कार्यक्रमा निमित्त रुई येथे क्रांती सुर्य गायन पार्टीचे पार्टी प्रमुख माधव पवार गायक व हार्मोनियम मास्टर सुरेश कागडे हार्मोनियम मास्टर गणपती पिराजी पवार गायक हनमंत गोविंद वाघमारे सेकंड पार्टी प्रमुख राहुल वाघमारे माळ इकळी येथील शाहीर यांच्या संचाने मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्या जीवन चारित्र यावर कवी माधव पवार यांच्या पार्टीच्या वतीने गीत गायनाचा कार्यक्रम बहारदार पद्धतीने संपन्न झाला आहे 







Post a Comment

0 Comments