"वारे" राज्याच्या मुख्यमंत्र्याची माझी लाडकी बहीण योजना घडीतच नियम बदलत असल्यामुळे अर्धवट बहिणीसाठी सदरची योजना सरकारने काढली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे
लाडक्या बहिनेचे आता पर्यंत मोबाईल वरून लाडक्या बहिणीचे फॉर्म दाखल करण्यात आले असताना सुद्धा सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी सदरची योजना काढली आहे
माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म दाखल करून घेण्यासाठी सदरची वेबसाईट बंद असल्यामुळे सेतू केंद्र धारक ही चांगलेच संतापले आहेत
मात्र खर तर सध्याच्या परिस्थिती मध्ये सदरची वेबसाईट पॉर्टलवर आली असल्यामुळे फार्म दाखल करण्यासाठी आधार लिंकची खुटी सरकारने मारली असल्याने "ना ओटीपी " येत आहे " ना साईड " चालू आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बहिणीच्या बँकेत खात्यात दीड हजार रुपये पडतील म्हणून एकीकडे बहीण अपेक्षा करत आहे तर दुसऱ्या बाजूने साईटच बंद असल्यामुळे व पोर्टलवर फॉर्म भरण्यासाठी आधार लिंकची कुट्टी मारली आहे
फार्म दाखल होत नसल्यामुळे सरकारने सदरची घातलेली खूटी काढून सरळ सरळ फॉर्म दाखल करण्यासाठी खुली करावी अशी मागणी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी कडून केली जात आहे

0 Comments