Header Ads Widget

बरबडा जिल्हा परिषद गटात ही मा.शिवराज पाटील होटाळकर यांना जनतेसह मतदारांनी दिला प्रतिसाद !!

        माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या बरबडा जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचे मा. शिवराज पाटील होटाळकर यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने गावा गावात चांगल्या प्रकारचा जनतेसह मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याने जन आशीर्वाद यात्रेला चांगलाच वेग आला आहे 
या मतदार संघात म्हणजे बरबडा जिल्हा परिषद गटाकडे विविध पक्षांच्या राजकीय पुढार्‍यांचे लक्ष लागून असते अशा या जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर याने जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून व या निमित्ताने  सदरची यात्रा या बरबडा जिल्हा परिषद गटात फिरविली असल्यामुळे या भागातील जनतेचा नक्कीच मा. होटाळकर यांना फायदा होणार आहे 

नायगाव धर्माबाद उमरी तालुक्यात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारी साठी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून सदरच्या मताची जुळवा जुळणी करत  येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकी मध्ये परिपूर्ण ताकद लावण्यासाठी आता पासूनच जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून सदरचा दौरा चालू केला जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 





Post a Comment

0 Comments