राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधान सभेच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होणार असल्याचे संकेत मिळताच राज्यातले राज्य सरकार हे शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी मोठ मोठाल्या आश्वासना बरोबर योजनेचा सुद्धा पाऊस पाडत आहे
राज्यातले सरकार यापूर्वी सुद्धा अनेक आश्वासन दिले होते परंतु कोणत्या ही आश्वासनाची पूर्तता अद्याप तरी केली नसल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत असून यापूर्वी दिलेले आश्वासन म्हणजे जन धन खात्याच काय झालं असा प्रश्न केला जात आहे
सध्याच्या परिस्थिती मध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार असल्याच्या संकेता मुळे सरकार महिलांसाठी योजना काढत आहे
गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले होते परंतु याच सरकारने केवायसीच्या नावाखाली अनेक शेतकऱ्याचे अनुदान रोखून ठेवल्यामुळे शेतकरी आज पर्यंत वंचित असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागातून दिसून येत आहे
सदरच्या केवायसी करत असताना अंगठा येत नसल्याने व शेतकऱ्यांला पंतप्रधान योजने बरोबर मुख्यमंत्री यांचे सुद्धा पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी अद्याप तरी हैराण असल्याचे स्पष्ट चित्र आहे
या वर्षी सुद्धा विमा भरण्यासाठी अंगठ्याची गरज नसते परंतु शासनाला मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी केवायसी करावी लागते व अंगठा येत नसल्याने आलेली शासनाची रक्कम शासन रोखून ठेवत आहे

0 Comments