Header Ads Widget

राज्य परिवहन मंडळाच्या बेजबाबदार पणामुळे नांदेड ते धर्माबाद बस सेवा घुंगराळा ते रुई बळेगाव मार्गे चालू होईना - खासदार आमदार लक्ष देईनात !!

         माधव पवार 
राज्य परिवहन मंडळाच्या बेजबाबदार पणामुळे नांदेड ते धर्माबाद बस सेवा घुंगराळा ते रुई बळेगाव मार्गे  खासदार आमदाराच्या दुर्लक्षित पणामुळे या मार्गांवर बस सेवा नागरिकासाठी चालू नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असून या संदर्भात भाजपाचे तथा सामाजिक कार्यकर्ता गजानन पाटील चव्हाण यांनी या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याना फोन द्वारे बस चालू करण्यासाठी काळजी पूर्वक विनंती केली आहे 

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु हा मार्ग चार ते पाच तालुक्याशी निघडीत असून यात नायगाव धर्माबाद उमरी भोकर मुदखेड या तालुक्याच्या मार्गांवर येतो गेल्या अनेक वर्षा पासून या विभागातुन खासदार झाले आमदार झाले परंतु या मार्गांवर बस सेवा चालू करण्यासाठी प्रयत्न केला नसल्यामुळे या मार्गांवर राज्य परिव्हन मंडळाची बस चालू नाही आता या लोकप्रतिनिधीनी देऊन बस चालू करावी अशी मागणी होताना दिसते आहे 


Post a Comment

0 Comments