Header Ads Widget

नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या कार्यकाळात पोलीस व पत्रकारासह जनतेत समन्वयाची भावना !!

         माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या कार्यकाळात जनसामान्य माणसा बरोबर गोरगरीब नागरिक व पत्रकारा सोबतचे समन्वयाचे व आपुलकीचे नाते फार अतूट होते परंतु ते आज नांदेड जिल्ह्यात राहिले नाही तत्कालीन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी पोलीस मित्र ही संकल्पना राबवून पोलिसा बद्दल असलेली भीती ही दूर करण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते 

तत्कालीन पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पने मधून शाळेतील विद्यार्थ्यांना त्याच बरोबर मुलींना सुद्धा एका दिवसाचे पोलीस ठाणे सांभाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हातात संबंधित पोलीस ठाण्याचा कारभार दिला होता आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे संबंधित पोलीस ठाणे सांभाळून पोलीस विभागात सुंदर असा संदेश विठ्ठलराव जाधव यांच्या संकल्पनेतून व माध्यमातून देण्यात आला होता 

नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी जनतेला व पोलिसाची भीती न राहता एक आपुलकीचे नाते निर्माण  व्हावे म्हणून पोलीस मित्र या संकल्पनेची निर्मिती केली सदरची संकल्पना ही नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस ठाणे प्रमुखांनी चांगल्या प्रकारे राबवून गावातील निर्व्यसनी मुलांना पोलीस मित्र म्हणून ओळखपत्र दिले होते 


जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या कार्यकाळात पोलीस व पत्रकारासह जनतेत समन्वयाची भावना होती परंतु सध्याच्या परिस्थिती मध्ये तशी दिसून येत नाही ठाण्यात जाण्यासाठी सुद्धा लोकांना विचार करावा लागत आहे हे वास्तव चित्र आहे 

Post a Comment

0 Comments