नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील मौजे कापशी बु येथील रहिवासी असलेले जेष्ठ नागरिक बुद्धवासी गोविंदराव किशनराव पट्टेकर यांचे दिनांक ११ मे २०२४ रोजी संध्याकाळी ठीक ९ वाजण्याच्या दरम्यान निधन झाले ते मृत्यू समयी ६२ वर्षाचे होते
बाबा मला तुझी आठवण रोज येते, मी स्वत:शी झगडताना मला मदत करणारा कोणीही नाही मायाळू, प्रेमळ नसलात तरी कधीही आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही आता अचानक सोडून गेल्यावर मला अजिबात करमत नाही असे त्याचे मुलं म्हणत आहे
आज माझा प्रत्येक शब्द ज्वालाकांड घडविणारा ठरो, हीच तुझ्या मृत भावनांना माझ्या जिवंत शब्दांची श्रद्धांजली ठरो.
तालुक्यातील कापशी बु येथे दिनांक १२ मे २०२४ दुपारी १२ वाजता कापसी येथे बोद्ध स्मशान भुमीत अंत्यसकार करण्यात येणार आहेत यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं एक मुलगी एक भाऊ सुना नातू पंतु असा त्याचा परिवार आहे

0 Comments