Header Ads Widget

लोकशाहीतील लोकसभा निवडणूक आणि मतदार राजा राजकीय पक्षाला पाहून नाही तर त्यांच्या कर्तुत्वाला पाहून मतदान मिळेल !!

        माधव पवार
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम देशातील  नागरिकांना संविधानाच्या माध्यमातून लोकशाही मिळून दिली या लोकशाहीच्या माध्यमातून लहान असो किंवा मोठा असो त्यांना एका मताचा अधिकार दिला असल्यामुळे लोकशाही मार्गाने मतदाना मतदान करण्याचा अधिकार आहे

राज्यात लोकसभेच्या निवडणुका चालू असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रचंड जाहीर सभा घेऊन विजयी करण्यासाठी आवाहन करीत असले तरी शेवटी मतदाराचा कौल कोणत्या उमेदवाराच्या बाजूने जाईल हे नक्की आताच सांगता येत नाही असे जनतेचे स्पष्ट मत आहे

नांदेड लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष वसंतराव चव्हाण या सदरच्या निवडणूक रणसंग्रामात मोठे ताकद लावली असल्याने सदरची निवडणुक टॉप लेवलने चालत आहे

लोकसभेच्या निवडणूक रणसंग्रामात महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ही विजयासाठी हाय पावर नेत्याच्या जाहीर सभा घेण्यात येत आहेत 

लोकशाहीतील लोकसभा निवडणूक आणि मतदार राजा राजकीय पक्षाला पाहून नाही तर त्यांच्या कर्तुत्वाला मतदान मिळेल असे चित्र सध्याच्या परिस्थिती मध्ये स्पष्ट दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments