Header Ads Widget

हिंगोली लोकसभेच्या आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी ? गावागावात-खेड्या-पाड्यात रंगतोय निवडणुकीची चर्चा

हिमायतनगर : नागोराव शिंदे

हिंगोली लोकसभा निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकारण तापू लागले असून गावागावातखेड्या पाड्यात निवडणुकीची चर्चा रंगत आहे.

या निवडणुकीच्या आखाड्यात कोणता पहिलवान मारणार बाजी मारणार यावर सट्टेबाजी जोमात आली आहे. कार्यकर्त्यांनाही आता सुगीचे दिवस आले असून दंड थोपटून आता तेही सज्ज झाले आहेत. निवडणुकीतील समीकरनांची गोळा बेरीज सुरू असून राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे गाव खेड्यातील वातावरण आता ढवळून निघणार आहे.

तद्वतच १५ हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी सुद्धा आता जनसंपर्क वाढविला असून, कार्यकर्तेही निवडणूक प्रचारासाठी सज्ज झाले आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारांनी दिलेले वचन पाच वर्षांत पूर्ण केले की नाही, याचीही आठवण मतदार ठेवून आहेत. यावर उमेदवार घामाघूम होणार आहे. कडाक्याच्या उन्हात ही निवडणूक होत असल्यामुळे विविधपक्षांच्या उमेदवारांना मतदार राजा पर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आहे.

त्यामुळे प्रचार करताना उमेदवारांच्या घामाचे लोट वाहत आहेत. अर्थातच या प्रखर उन्हामुळे प्रचारासही थोडा बहुत फटका प्रत्येकच पक्षास बसू शकतो. एकीकडे कडाक्याच्या उन्हाळ्यात निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून जीवाची तर कसरत होत च आहे परंतु वातावरणात उकाडा जाणवत असल्यानेच मतदार उमेदवाराना मुद्यां चे  प्रश्न विचारले जात आहे.

संपूर्ण मतदार संघातील  मतदार झाली शक्तीनिशी संपूर्ण संघातील सज्ज होत कामासाठी नियुक्त केलेल्या आश्वासन पाच करून देणार देताना मात्र घामाचे लोकसभा लाही लाही होत आहे. दुसरीकडे तापलेल्या राजकीय ज्वलंत प्रश्नांचा उमेदवारांना सोसावा आहे. ग्रामीण भागातील राजाही अनेक ज्वलंत उकरून काढत उमेदवाराला विचारण्याच्या तयारीत निवडणूक प्रशासनही मागे शक्तीनिशी कामाला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासनाकडूनही मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी असून संपूर्ण प्रशासन सर्व कामाला लागले आहे

हिंगोली लोकसभा मतदार मतदान बुथ, अद्यावतपणे असून, निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणे सुद्धा नियोजित पणे सुरू असून कुठे काही उनिवा भासत आहेत का? याचा शोधही घेतला जात आहे

निवडणुकीचे वातावरण पूर्णतः तयार झालेले आहे. ग्रामीण भागातील समस्या मात्र जैसे थे... प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार प्रचारादरम्यान मतदारांना आपण करणार असलेल्या विकासा बाबत बक्कळ आश्वासने देऊन त्या निवडूनही येतात. मात्र, पुन्हा ते दिलेली सर्व आश्वासने विसरतात. बहुतांशी

ग्रामीण भागात, हक्काचे घरकुल, शेतकऱ्यांना २४ तास : वीज, गावागावांत स्मशानभूमी, सिमेंट रस्ते, पाणीटंचाई निवारण, सिंचन सुविधा असे अनेक महत्त्वाचे प्रश्न अजूनही जैसेथेच आहेत. ग्रामीण भागातील तरुणांचे रोजगारा अभावी मोठ्या प्रभाणावर स्थलांतर होत

असून त्यांच्या हाताला काम हवे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील समस्यांचा डोंगर आजही कायम असून दिलेली आश्वासने मात्र जिथल्या तिथेच विरल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments